नगर । प्रतिनिधी - अहमदनगर महाविद्यालयाच्या संगणकशास्त्र विभागाचे विद्यार्थी विलफ्रेड कुटिनो व श्रद्धा सुराणा यांची कॅम्प्स् मुलाखतीद्वारे कॅप जेमिनी या नामांकित कंपनीमध्ये निवड झाली आहे. या यशाबद्दल महाविद्यालयाच्यावतीने प्राचार्य डॉ. आर. जे. बार्नबस यांनी पुष्पगुच्छ देऊन या विद्यार्थ्यांचा सत्कार केला. याप्रसंगी डॉ. कमलाकर भट, ए. वाय. बळीद, संगणकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रजाक सय्यद आदी उपस्थित होते.
या निवड प्रक्रियेमध्ये अॅप्टीट्यूट परीक्षा, टेक्निकल व एच. आर. मुलाखत या फेर्या झाल्या. या मुलाखतीसाठी 2559 विद्यार्थी होते. त्यातील 249 विद्यार्थ्यांची निवड झाली. यामध्ये विलफ्रेड व श्रद्धा यांचा देखील समावेश आहे.
No comments:
Post a Comment