Tuesday, 22 January 2019

भातोडी-चिचोंडी पाटील रस्त्याचे काम मार्गी


नगर । प्रतिनिधी - राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अशोक कोकाटे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे भातोडी ते चिचोंडी पाटील हद्दीतील दोन किलोमीटर रस्ता व पाठदुरूस्ती केली. आमदार राहुल जगताप यांच्याकडे पाठपुरावा करून त्यांच्या आदेशामुळे हे काम मार्गी लागल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले. रस्त्याचा प्रश्न सुटल्याने शेतकर्‍यांनी अशोक कोकाटे यांचा सत्कार करून आभार मानले.  
सविस्तर माहिती अशी की, नगर तालुक्यातील भातोडी ते चिचोंडी पाटील हद्दीतील रस्त्याची अवस्था अत्यंत वाईट झाल्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांच्या वहिवाटीचा प्रश्न निर्माण झाला होता. मागील काळात गाळ वाहतूक करताना अंतराच्या बचतीमुळे जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी व  विटभट्टी चालकांनी याच रस्त्याने वाहतूक केल्याने रस्ता खराब झाला होता. तर अवजड वाहतुकीमुळे या शेजारी असणार्‍या पाठ रस्त्याचीही दुरवस्था झाली होती. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने शेतकर्‍यांचा दळणवळणाचा प्रश्न निर्माण झाला होता. या रस्त्यासाठी परिसरातील शेतकर्‍यांनी प्रशासन व राजकीय नेत्यांकडे तसेच पाटबंधारे विभागाकडे अनेक वेळा रस्ता दुरुस्तीसाठी पाठपुरावा केला होता. मात्र, याकडे शासनाकडून दुर्लक्ष केले. त्यांनतर शेतकर्‍यांनी एकत्र येत राष्ट्रवादीचे नगर तालुका कार्याध्यक्ष अशोक कोकाटे यांच्याशी चर्चा करून या रस्त्याच्या प्रश्नात चर्चा केली. त्यानंतर कोकाटे यांनी तातडीने नगर-श्रीगोंदा मतदारसंघाचे आमदार राहुल जगताप यांच्याशी चर्चा करून हा विषय मार्गी लावला. आ. जगताप यांनी पाटबंधारे विभागाच्या अधिकार्‍यांना पाठ दुरुस्ती व दोन कि.मी.रस्ता दुरुस्ती करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार रस्त्याचे काम मार्गी लागले. त्यामुळे परिसरातील शेतकर्‍यांनी आमदार जगताप यांचे आभार व्यक्त करून अशोक कोकाटे यांचा सत्कार केला. यावेळी भारतीय जनसंसदचे जिल्हाध्यक्ष सुधीर भद्रे, अंबादास खांदवे, उद्धव जगताप, भाऊ बेरड, शंकर गवांडे, नवनाथ काळे, कैलास खांदवे, बाबासाहेब भद्रे, विलास खांदवे, म्हातारदेव वाळके, अशोक खांदवे आदी शेतकरी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment