Tuesday, 5 February 2019

लाचखोर एपीआय शिंदेंसह दोघांना एसीबीकडून अटक


नगर । प्रतिनिधी - स्वस्तात सोने देण्याच्या अमिषाच्या गुन्ह्यात अटक न करण्यासाठी 2 लाखांच्या लाचेची मागणी करणार्‍या नगर तालुका पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण शिंदेंसह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अटक केली आहे. 
नगर तालुक्यातील बुरुडगाव येथे 2017 मध्ये स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून एका व्यापार्‍याला लुटले होते. या गुन्ह्यात आठ आरोपींचा समावेश होता. परंतु सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांनी तब्बल 51 जणांची यादी तयार करुन प्रत्येक व्यक्तीला वेगवेगळ्या दिवशी बोलावून घेत ‘तुझे या गुन्ह्यात नाव आहे’ असे धमकावून गुन्ह्यातून नाव वगळण्यासाठी प्रत्येकालाच सावज केेले जात होते. त्यापैकी एकाला असा प्रकार करताना त्याच्याकडून तब्बल 2 लाखांची लाचेची मागणी केली. संबंधित व्यक्तीने थेट लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. 
त्यामध्ये किरण शिंदे व एक पोलीस कर्मचारी आनंद सत्रे अशा दोघांनी लाचेची मागणी केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यानुसार लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने गुन्हा दाखल केला होता. 
या घटनेनंतर किरण शिंदेंसह दोघे फरार झाले होते. त्यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठीही अर्ज केला होता. परंतु न्यायालयाने तो फेटाळला होता. लाचलुचपतससोर हजर होण्याशिवाय त्यांना पर्याय नव्हता. त्यामुळे ते स्वतःहून हजर झाल्यावर लालुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने अटक केली आहे.

No comments:

Post a Comment