Wednesday, 6 February 2019

रियाझ करणाराच संगीत क्षेत्रावर राज्य करेल ः संकेत बर्डिया


नगर । प्रतिनिधी - संगीत व गायन क्षेत्रात अनेक कलावंत पुढे येताना दिसत आहेत. जो रोज रियाझ करेल तोच संगीत क्षेत्रावर राज्य करेल. संगीत व गायन करताना कलाकारामध्ये अहंकार नसावा आणि शेवटपर्यंत नवीन काही शिकण्याची वृत्ती असावी, असे प्रतिपादन चित्रपट क्षेत्रातील संगीतकार संकेत बर्डिया यांनी केले.
नगरच्या अजित सिंग्ज रिदम म्युझिक अ‍ॅकेडमीच्या वतीने सावेडीतील माऊली सभागृहात म्युझिकल फिस्ट कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे उद्घाटन बर्डिया यांच्याहस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी अ‍ॅकेडमीचे हरजितसिंह वधवा, संचालक अजितसिंह वधवा, सिनेकलाकार कामोद खराडे, गायक अंगद गायकवाड, तबला वादक संजय हिंगणे, देवेंद्रसिंह वधवा, मोहनसिंग वधवा, अमरजितसिंह वधवा, मनप्रितसिंह वधवा, दलजितसिंह वधवा, प्रिटी ओबेरॉय, राजेंद्र चावला, बलजितसिंह वधवा, जसमितसिंह वधवा, सनी वधवा, गुरबीरसिंग नारंग, प्रीत नारंग, मनयोग माखिजा, मोहनसिंह, जसबीरकौर वधवा आदी उपस्थित होते. 
यावेळी अ‍ॅकेडमीच्या 65 विद्यार्थ्यांनी एकाचवेळी रॉक संगीताचे बहारदार सादरीकरण करत सोलो ड्रम, पियानो, तबला, गिटाराद्वारे उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
बर्डिया पुढे म्हणाले, पूर्वी शहरात संगीत शिक्षणासाठी कोणतीही प्रशिक्षण अ‍ॅकेडमी नव्हती. आवड असून देखील अनेक कलाकारांना संगीताचे ज्ञान मिळणे कठीण होते. आज रिदम म्युझिक अ‍ॅकेडमीच्या माध्यमातून मुलांना विविध वाद्य शिकण्यास संधी निर्माण झाली असून, याद्वारे अनेक कलाकार घडणार आहेत.
प्रास्ताविक अजितसिंह वधवा यांनी केले. यावेळी कामोद खराडे, झी सारेगमप विजेती अंजली गायकवाड, नंदिनी गायकवाड, केशव गाडेकर, मंगेश कुलकर्णी यांनी उपस्थित कलारसिक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते नवोदित गायिका गायत्री शिंदे यांना रिदम एक्सलन्स अ‍ॅवॉर्ड 2019ने गौरविण्यात आले. तसेच संगीत शिक्षक संजय हिंगणे, जोसेफ वाघमारे, अंगद गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी चित्रकार प्रमोद जगताप यांनी ए. आर. रेहमान यांचे गिटार वाजवितानाचे चित्र साकारले. 
कार्यक्रम यशस्वीतेसाठी जयराज शेळके, प्रीतम गायकवाड, अनिरुध्द देशमुख, शुभम कार्ले, योगेश कोथंबिरे, पराग लोखंडे, निकिता खंडागळे, नीट रासने, जान्हवी थोरवे, शुभम शेरकर, स्नेहल लवांडे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले. तेजिंदरकौर वधवा यांनी आभार मानले.

No comments:

Post a Comment