Thursday, 7 February 2019

राष्ट्रवादीच्या वतीने नेहमीच गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे कार्य


नगर । प्रतिनिधी -  शहरात अनेक गुणवंत खेळाडू पुढे येत असून, त्यांना राष्ट्रवादीच्या माध्यमातून नेहमीच प्रोत्साहन देण्याचे कार्य चालू आहे. खेळाडूंना योग्य दिशा, मार्गदर्शन व प्रोत्साहन मिळाल्यास ते आपले ध्येय गाठत असतात. राहुल थोरात याने राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत यश संपादन करुन शहराचे नांव उंचावले आहे. राष्ट्रवादीच्या वतीने नेहमीच गुणवंत खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे कार्य आहे असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. 
राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धेत भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचा विद्यार्थी राहुल सुनील थोरात याने सुवर्णपदक पटकाविल्याबद्दल त्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आ.संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संजय क्षीरसागर, सुदर्शन ढवळे, अजिंक्य म्याना, सुनील थोरात, अभिजीत खरपुडे, ज्ञानेश्वर बुधवंत आदिंसह खो-खो खेळाडू उपस्थित होते.             
नुकतीच बैंगलोर (कर्नाटक) येथे 64 वी राष्ट्रीय शालेय खो-खो स्पर्धा पार पडली. 14 वर्षाखालील महाराष्ट्राच्या संघाकडून खेळताना थोरात याने उत्कृष्ट कामगिरी करीत सुवर्ण पदक पटकाविले आहे. तसेच उपस्थितांनी थोरात या नवोदित खेळाडूला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments:

Post a Comment