Friday, 8 February 2019

भातोडी येथे राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन




नगर । प्रतिनिधी -  नगर तालुक्यातील भातोडी येथे राज्यस्तरीय टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन येत्या शुक्रवार दि. 15 फेब्रुवारी रोजी करण्यात आले आहे. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली असून या स्पर्धेचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन संषर्घ मित्र मंडळाचे अध्यक्ष प्रवीण लबडे व उपाध्यक्ष दत्ता कदम यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केले. यावेळी सरपंच बाबसाहेब नेटके, उपसरपंच भरत लबडे, सेवा सहकारी सोसायटीचे माजी उपाध्यक्ष राजु पटेल, ग्रामपंचायत सदस्य आजिनाथ शिंदे, अमोल कदम आदि उपस्थित होते.  
प्रवीण लबडे म्हणाले की, यापूर्वीही अशा स्पर्धेंचे आयोजन आम्ही केलेले आहे. राज्यभरातून मोठ्या प्रमाणात संघ या स्पर्धेत सहभागी होतात. या वेळेसही क्रिकेट खेळाडूंसाठी ही मेजवानी आहे. मनपा नगरसेवक योगिराज गाडे व संभाजी ब्रिगेडचे नेते राजेश परकाळे यांच्यावतीने प्रथक क्रमांकाचे बक्षिस 15 हजार रूपये, आष्टी तालुक्याचे पंचायत समितीचे सभापती अशोक इथापे, मातोश्री विट कारखान्याचे प्रमुख व सामाजिक कार्यकर्ते अशोक तरटे यांच्यावतीने 11 हजार रूपयांचे दुसरे बक्षिस तर सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष विश्वनाथ कदम व सेवा सहकारी सोसायटीचे माजी उपाध्यक्ष तथा ग्रामपंचायत सदस्य राजु पटेल यांच्या वतीने 7 हजार रूपयांचे तृतीय बक्षिस ठेवण्यात आले आहे. यासह विशेष उत्तेजनार्थ बक्षिसे ठेवण्यात आले आहेत. प्रत्येक सामना हा आठ षटकांचा राहील, स्पर्धेचे सर्व नियम हे संयोजकांच्या स्वाधीन असतील. 
काही वाद उपस्थित झाल्यास अंतिम निर्णय सुध्दा संयोजकाचा असेल. स्पर्धेची प्रवेश फी 550 रूपये ठेवण्यात आली आहे. स्पर्धेत सहभागी होण्यासाठी व नावनोंदणीसाठी मो.9730655523 आजिनाथ शिंदे, 9834304060 दत्ता कदम, 9359955859 प्रवीण लबडे यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे. 
आजपासून प्रवेश नोंदणी सुरू झाली असून 15 फेब्रुवारीच्या दिवशी सुध्दा प्रवेश घेतला जाणार आहे. तसेच त्यानंतरही चार दिवस प्रवेश मिळणार असल्याचे लबडे यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment