Monday, 4 February 2019

राष्ट्रीय रोप स्किपींग स्पर्धेत श्रीकांत तांबेचे यश


नगर । प्रतिनिधी - शिर्डी येथे नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील आय. आर. एस. एफ. इंडियन रोप स्किपींग स्पर्धेत सावेडीच्या श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेचा खेळाडू श्रीकांत संतोष तांबे (इयत्ता तिसरी) याने रौप्य आणि सुवर्णपदक पटकावले. श्रीकांतला प्रशिक्षक प्रदीप देवके, क्रीडाशिक्षक पोपट लोंढे यांचे मार्गदर्शन मिळाले.
याबद्दल त्याचा सावेडीच्या श्री समर्थ विद्या मंदिर प्रशालेच्या वतीने नगरसेवक भैय्या गंधे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शाळेचे मुख्याध्यापक कासार यांनीही यावेळी श्रीकांतचे कौतुक केले.
याप्रसंगी भैय्या गंधे म्हणाले, शालेय शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी शिक्षणाबरोबरच खेळाची आवड जोपासणे आवश्यक आहे. पालक व शिक्षकांनीही यासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. खेळातही करिअर करण्याची चांगली संधी आहे.
श्रीकांत हा नगरमधील बांधकाम व्यावसायिक ज्ञानराज कन्स्ट्रक्शनचे संचालक संतोष तांबे यांचा मुलगा आहे. त्याने महिनाभरापूर्वी झालेल्या राज्यस्तरीय रोप स्किपींग स्पर्धेतही प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकावले होते. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

No comments:

Post a Comment