Monday, 4 February 2019

‘अशोकभाऊ फिरोदिया स्मृती करंडक’ राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा बुधवारपासून


नगर । प्रतिनिधी - अहमदनगर एज्युकेशन सोसायटी, अशोकभाऊ फिरोदिया चॅरिटेबल ट्रस्ट व जिल्हा क्रिकेट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने अशोकभाऊ फिरोदिया स्मृती करंडक शालेय व खुल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा वाडिया पार्क मैदानावर बुधवार, दि. 6 रोजी सकाळी 10.30 वाजता सुरू होणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन आमदार अरुण जगताप यांच्या हस्ते व अ.ए.सोसायटीच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. स्पर्धेचे हे बारावे वर्ष असून, ही स्पर्धा फ्लडलाईटमध्ये खेळली जाणार आहे.
सदरची स्पर्धा ‘बाद’ पध्दतीने होणार आहे.  महाराष्ट्रातून खुल्या गटात निमंत्रित 32 संघांचा व शालेय गटात 12 संघांचा स्पर्धेत समावेश असणार आहे. यामध्ये मुंबई, पुणे, नाशिक, जळगांव, औरंगाबाद, ठाणे येथील नामवंत क्रिकेट संघ सहभागी होत आहेत. नगरकरांना अनेक नामवंत रणजी खेळाडूंचा खेळ पहावयास मिळणार आहे. विजयी खुल्या गटातील संघासाठी रोख रू. 1,00,000/- व आकर्षक करंडक, उपविजेत्या संघासाठी रू. 71,000/- व आकर्षक करंडक, तृतीय दोन संघांसाठी रू. 15,000/- व आकर्षक करंडक देण्यात येणार आहे. प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ दी मॅच तसेच मॅनऑफदी सिरीजसाठी रू. 11,000/-रोख व करंडक, उत्कृष्ट फलंदाज/ गोलंदाज/ क्षेत्ररक्षक / यष्टीरक्षक यांनाही प्रत्येकी रू. 5000/-रोख व करंडक स्वरूपात पुरस्कार देण्यात येईल.विजयी शालेय गटातील संघासाठी रोख रू. 31,000/- व आकर्षक करंडक, उपविजेत्या संघासाठी रू. 21,000/- व आकर्षक करंडक, तृतीय दोन संघांना रोख रू. 11,000/- व आकर्षक करंडक देण्यात येणार आहे. प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ दी मॅच तसेच मॅन ऑफ दी सिरीजसाठी रू. 5,000/-रोख व करंडक, उत्कृष्ट फलंदाज/ गोलंदाज/ क्षेत्ररक्षक / यष्टीरक्षक यांनाही प्रत्येकी रू. 3000/-रोख व करंडक स्वरूपात पुरस्कार देण्यात येणार आहेत, अशी माहिती अशोकभाऊ फिरोदिया चॅरिटेबल ट्रस्टचे गौरव फिरोदिया व अहमदनगर जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे गणेश गोंडाळ व प्रा. माणिक विधाते यांनी दिली.  
 या स्पर्धांंबरोबरच फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्याात राज्यस्तरीय महिला कबड्डी व पुरूषांसाठी व्हॉलीबॉल स्पर्धा घेण्यात येणार आहे, अशीही माहिती देण्यात आली.

No comments:

Post a Comment