Tuesday, 5 February 2019

बासरी वादन स्पर्धेत शिवराज भोर प्रथम


नगर । प्रतिनिधी - येथील रावसाहेब पटवर्धन स्मारक समितीच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय बाल संगीत महोत्सवात सूरवाद्य वादनात गुरुकुलातील साधक शिवराज बाबा भोर याने प्रथम क्रमांक मिळविला. त्यास मान्यवरांच्या हस्ते एक हजार रुपये व प्रशस्तीपत्रक देण्यात आले. शिवराज हा नगरमधील संगीतबहार गुरुकुल विहारचे प्रसिद्ध बासरीवादक जितेंद्र प्रताप रोकडे यांच्याकडे बासरीचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेत आहे. तो नेप्ती विद्यालयात इयत्ता 5 वीत शिकत आहे. या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments:

Post a Comment