Thursday, 9 January 2025

*निसर्गसृष्टी गोपालन संस्थेत स्व. सौ.सुनंदा दिगंबर जोशी सभागृहाचा लोकार्पण सोहळा संपन्न*


 *गो सेवेचे कार्य ईश्वरप्रिय-महंत रामगिरी महाराज* 

अहिल्यानगर - संकटातून व प्रयत्नातून निसर्गसृष्टी गोशाळा सुरू झाली या गोशाळेत मोठ्या प्रमाणात कत्तलखान्यातून वाचविलेल्या गाईंचा सांभाळ केला जातो. भगवान परमात्मा श्रीकृष्णाने गोपालन व गोसंवर्धन केले आहे.गोसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे.राजयोगी गंगागिरी महाराजांनी सव्वा दोनशे वर्षांपूर्वी सरला बेट येथे गोशाळा सुरू केली आहे.गोहत्या होऊ नयेत यासाठी कायदा केला आहे.तरी देखील गोहत्या होत आहेत.जे गोरक्षा चे कार्य करतात त्यांना सहकार्य करावे.तसेच शेतकऱ्यांनी देखील कसायाला काय विकू नये. महाराष्ट्र राज्य सरकारने गोमातेला राजमाते चा दर्जा दिला आहे.तसेच प्रत्येक गाईसाठी पन्नास रुपये निधी जाहीर केला आहे.यामुळे एक दोन एकर शेती असलेल्या शेतकऱ्याला गाई विकण्याची गरज भासणार नाही.असे प्रतिपादन सरला बेट चे महंत गुरुवर्य रामगिरी महाराज यांनी केले आहे.

इसळक येथे निसर्ग सृष्टी गोपालन संस्था संचलित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज गोशाळेत श्री भगवान महावीर जीवदया निवारा शेड, स्व.सौ.सुनंदा दिगंबर जोशी सभागृह लोकार्पण सोहळा आणि गोमाता मुक्तसंचार गोठा भूमीपूजन सोहळा उत्साहात पार पडला‌.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संत गंगागिरी महाराज संस्थान,गोदाधाम सरला बेटचे मठाधिपती महंत गुरुवर्य हभप.रामगिरी महाराज, विदर्भरत्न रामायणाचार्य ह.भ.प.संजय महाराज पाचपोर, प्रज्ञाचक्षु गुरुवर्य मुकुंद काका जाटदेवळेकर महाराज,संत तुकाराम महाराज यांचे १० वे वंशज ह.भ.प. माणिक महाराज मोरे,वर्धमान संस्कारधाम, मुंबईचे राजुभाई शाह,बजरंग दलाचे महाराष्ट्र व गुजरात राज्याचे क्षेत्रीय संयोजक विवेक कुलकर्णी,आ.संग्राम जगताप,अक्षय कर्डिले,प्रांत संघचालक नानासाहेब जाधव,समस्त गोरक्षा आघाडीचे अध्यक्ष मिलींद एकबोटे,हभप श्रीनिवास महाराज घुगे, मठाधिपती योगेश भैय्या गायकवाड महाराज,दीनदयाळ परिवाराचे संस्थापक अध्यक्ष वसंत लोढा,भाजपाचे नितिन उदमले,उद्योजक भिमराव फुंदे,महेश इंदानी,सुहास फुंदे, बाबासाहेब सानप,भगवान फुलसौंदर,इसळकचे माजी सरपंच संजय गेरंगे,सरपच छायाताई गेरंगे आदींच्या प्रमुख उपस्थितीत निसर्गसृष्टी गोपालन संस्थेत उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
यावेळी गोभक्त,हिंदू धर्म बांधव व जिल्ह्यातील गोरक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विदर्भ रत्न संजय महाराज पाचपोर म्हणाले,जोशी परिवाराच्या देणगीतून निसर्गसृष्टी गोपालन संस्थेत एक चांगले सभागृह उभारले आहे.गो सेवेच्या कार्यात जोशी परिवाराचे मोठे योगदान आहे.गरज आहे त्या ठिकाणी दान करणे महत्त्वाचे आहे.गोमातेला आपण दान द्यायची गरज आहे.आई आपल्याला सांभाळते न मागता जे पाहिजे ते देते.परंतु आज गोमातेला गरज पडावी.हे आपले दुर्भाग्यच आहे.यज्ञ केल्याने जे पुण्य भेटते,तीर्थक्षेत्राने जे पुण्य भेटते,तेच पुण्य गोसेवा केल्याने भेटते. 
आमदार संग्राम जगताप म्हणाले, हिंदू धर्मात गोमातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गोहत्या बंदी कायदा करून देखील गोहत्या होत आहेत.गोहत्या करणाऱ्या आरोपींनी वारंवार गुन्हे केले तर त्यांना मोक्का लावण्यात यावा.असा कठोर कायदा करण्याची आवश्यकता आहे.यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करू.तसेच जिल्ह्यात आणखी गोशाळांची आवश्यकता आहे.असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम कराळे यांनी केले.तर आभार आभार श्रीनिधी सोमिनी यांनी मानले‌.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिंगबर जोशी,उद्योजक धनंजय जोशी,निसर्गसृष्टी गोपालन संस्थेचे अध्यक्ष डाॅ.विलास जाधव,सचिव गौतम कराळे, उपाध्यक्ष विश्वास बेरड, खाजिनदार गजेन्द्र सोनवणे,विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल भांबरकर,हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष संजय आडोळे,उद्योजक बाळासाहेब लोटके,अपुर्व गुजराथी,ललित चोरडिया,मुकल गंधे,निलेश चिपाडे,भुषण भणगे,रुद्रेश अंबाडे,निलेश गेरंगे,विकास चव्हाण,रविन्द्र पवार,
अमोल हुंबे पा.श्रीकांत साठे,निखिल धंगेकर,रुद्रेश अंबाडे,
हभप रविन्द्रनाथ महा.सुद्रिक, विष्णुपंत कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील गोरक्षक व हिंदू धर्म बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Saturday, 10 August 2024

चांगले रस्ते निर्माण झाल्याने नागरिकांचा सुखकर प्रवास होईल - आ. संग्राम जगताप

 शहरातील डीपी रस्त्यांची कामे मार्गी लागावी यासाठी साडेतीनशे कोटीचा विकास आराखडा तयार केला. त्यानुसार राज्य सरकारच्या माध्यमातून दीडशे कोटी रुपये प्राप्त झाले आहे, याचबरोबर नगरसेवकांच्या मागणीनुसार 44 कोटी रुपये मिळाले आहे, या माध्यमातून शहरांमधील विविध भागांमध्ये रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे नागरिक स्वागत करत असून मंजूर विकास कामाचे नारळ फोडण्याचा आग्रह धरत आहे, माऊली संकुल चौक ते गंगा उद्यान हा रस्ता अत्यंत खराब झाला होता त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते, शहरातील दळणवळणाचा कायमस्वरूपीचा प्रश्न मार्गी लावण्याचे काम केले आहे या माध्यमातून रस्ते एकमेकांना जोडली जातील व चांगले रस्ते निर्माण झाल्याने नागरिकांचा सुखकर प्रवास होईल या माध्यमातून व्यापारीकरण देखील वाढले जाते. गंगा उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत नवीन रस्ता निर्माण केला. मनमाड महामार्ग ते छत्रपती संभाजी नगर महामार्गाला हा रस्ता जोडला जाणार असल्याची प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. 
       आमदार संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून माऊली संकुल चौक ते गंगा उद्यान ते जिल्हाधिकारी कार्यालय छत्रपती संभाजीनगर महामार्गापर्यंत रस्ता कॉंक्रिटीकरण कामाचा शुभारंभ अरविंद पारगावकर यांच्या हस्ते संपन्न झाला, यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी उपमहापौर गणेश भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष संपत बारस्कर, माजी नगरसेविका शोभा बोरकर, अशोक गायकवाड, निखिल वारे, अजिंक्य बोरकर , बाळासाहेब पवार, अमोल गाडे, संजय चोपडा, काकासाहेब शेळके, मनोज दुल्लम, उदय कराळे, करण कराळे, एडवोकेट येव्होन मकासरे, सतीश बारस्कर, डॉक्टर सतीश सोनवणे, डॉक्टर प्रशांत पठारे, रमेश खिलारी, सतीश गुंफेकर, संजय खामकर ,विजय मगर, भरत पवार, बबन काळे, विशाल शिंदे ,जयकुमार खूपचंदानी, बाळासाहेब गायकवाड, सुशील बजाज, जयराम काबरा, सनी अहुजा ,डॉक्टर वाळेकर, डॉक्टर भोईटे ,महादेव काकडे ,जितू खंडेलवाल, जितू गंभीर, सुशील थोरात, सुबा खंडेलवाल, अशोक गोपलानी, मयूर कुलथे, सुमित महाजन ,मुकुल गंधे ,योगेश सोनवणे, बाबासाहेब भोंगे, सुमित कुलकर्णी ,आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
        

Saturday, 22 June 2024

महापालिकेत जागतिक योग दिन साजरा

मनपाच्या वतीने जनतेमध्ये योगासंदर्भात जनजागृती केली जाणार - अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी
देशामध्ये जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून आज अहमदनगर महानगरपालिके तील अधिकारी कर्मचारी यांनी एकत्र येत योगाचे महत्त्व समाजाला पटवून देण्याचे काम केले आहे. भविष्यकाळात नगर शहरातील जनतेमध्ये योगासंदर्भात जनजागृती केली जाणार आहे. योग हा व्यायाम नसून एक जीवन पद्धत आहे. योगामुळे शरीर, मन, बुद्धी या सर्वांवर चांगला परिणाम होत असून आनंदीमय जेवण जगता येत असते. शासकीय कर्मचारी यांना काम करीत असताना ताण-तणाव निर्माण होत असतो. मात्र दैनंदिन योग साधनेच्या माध्यमातून आपले शरीर निरोगी व सुदृढ राहत असते त्यामुळे आपण समाजामध्ये चांगले काम करू शकतो. असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी केले. 
   अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने जागतिक योग दिन उत्साहात साजरा केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी,प्रकाश लोखंडे, उपयुक्त विजयकुमार मुंडे, उपयुक्त श्रीकांत साताळकर, जल अभियंता परिमल निकम, शहर अभियंता मनोज पारखे, आस्थापन विभाग प्रमुख मेहेर लहारे, इंजिनिअर गणेश गाडळकर, आदीसह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रकश लोखंडे , डॉ. भावना पेंदम, बेलेश्वर पेंदम यांनीं योगा प्रशिक्षण दिले.

Saturday, 15 June 2024

विद्यालयांत नवगतांचे स्वागत उत्साहात


महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीच्या अभिनव बालवाडी, सखाराम मेहेत्रे प्राथमिक विद्यालय व केशवराव गाडीलकर हायस्कूलचे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ दि. १५/०६/२०२४ रोजी विद्यालयात मोठ्या उत्साहान संपन्न झाला. अध्यक्षस्थानी महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा. श्री. नामदेवराव गाडीलकर यांनी भूषविले. कार्यकमाचे प्रमुख अतिथी महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा. श्री. वसंतराव बेलेकर, सदस्य मा. श्री. विलासराव सावळे मा. सौ. पुष्पाताई बोरुडे, अध्यक्षा, महिला व बालविकास समिती, अहमदनगर महानगरपालिका व मा. सौ. वंदनाताई ताठे, नगरसेविका, अहमदनगर महानगरपालिका हे उपस्थित होते. श्री. नामदेवराव गाडीलकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यालयांतील विद्यार्थ्यांना गुणवान होण्यासाठी तसेच सर्व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहू असे अश्वासन दिले. तसेच विद्यालयाच्या निसर्गरम्य वातावरणाचे कौतुक करून गोरगरीब अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाणारी शाळा असे सौ. पुष्पाताई बोरूडे यांनी आपल्या भाषणांत सागितले. तसेच सौ. वंदनाताई ताठे यांनी नविन वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देवून मुलीनी मोफत शिक्षणाचा फायदा घेवून उच्चशिक्षित व्हावे असे आवाहन केले.
विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास हेव विद्यालयाचे ध्येय असून विविध स्पर्धा परीक्षांतून विद्यालयाचा नावलौकीक वाढवावा असे संस्थेचे उपाध्यक्ष श्री वसंतराव बेलेकर यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात सांगितले.
कार्यक्रमावेळी प्राथमिक विद्यालयाच्या प्र.मुख्याध्यापिका श्रीम. काळे लतिका आप्पाजी, माध्यमिक विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक श्री. गायकवाड अनिल शंकर, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच परीसरातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीम. संगिता बनकर व आभारप्रदर्शन सौ. जयश्री देशपांडे यांनी केले,

Sunday, 2 June 2024

*मेहेर इंग्लिश स्कूलमध्ये ढोल ताशा व तुतारीच्या गजरात नवागतांचे स्वागत*

*बालवयातच मुलांना शाळेची आवड निर्माण व्हावी-जगदीश झालानी*                                             

मुलांनी शाळेत आल्यानंतर आनंदी वातावरणात शिक्षण घ्यावे.यासाठी शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच शाळेतील शिक्षक प्रयत्न करीत असतात.मुलांना शाळेचा कंटाळा येऊ नये. यासाठी मुलांना विविध खेळ, संगीत,नृत्य,गोष्टींची पुस्तके आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे.बालवयातच मुलांना शाळेची आवड निर्माण व्हावी. असे प्रतिपादन मेहेर इंग्लिश स्कूलचे चेअरमन जगदीश झालानी यांनी केले आहे. हिंद सेवा मंडळाच्या मेहेर इंग्लिश स्कूलमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांचे स्वागत ढोल,ताशाच्या व तुतारीच्या गजरात मोठ्या उत्साहात करण्यात आले.प्रवेशद्वारासमोर आकर्षक फुग्यांची कमान करण्यात आली होती.शाळेतील शिक्षिका राजश्री बिडकर यांनी मिकी माऊसचा वेष परिधान करून सगळ्यांचे लक्ष वेधले.दा चौधरी विद्यालय,पटवर्धन चौक येथून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली.मेहेर इंग्लिश स्कूलच्या प्रवेशद्वारा जवळ आल्यानंतर शाळेतील शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला औक्षण करून फुलांची उधळण केली.
याप्रसंगी मेहेर इंग्लिश स्कूलचे चेअरमन जगदीश झालानी,प्राचार्या प्रा.अनुरीता झगडे,दादा चौधरी मराठी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष येवले, दीपक शिंदे,संतोष भंडारी,मनोज हिरणवाळे,सत्यश्री चिलका, मोहिनी नराल,आशा घोरपडे, राजश्री बिडकर,दळवी पूनम,सुनिता भोपाळे,आयमन बागवान आदी उपस्थित होते. प्रा.अनुरीता झगडे म्हणाले,मेहेर इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी हसत खेळत शिक्षण घ्यावे. यासाठी वर्षभर विविध उपक्रम सण,उत्सव साजरे केले जातात.तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहावे.यासाठी विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबीर ही घेतले जाते.तसेच प्राणायाम विविध व्यायामाच्या प्रकारे शिकवले जातात.

Thursday, 9 May 2024

*जो हिंदू हितकी बात करेगा!वही देश पे राज करेगा -शंकरजी गायकर*

विश्व हिंदू परिषदेचा हिंदू जनसंवाद मेळावा उत्साहात*                                                                                                  
   नगर-देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. देशहितासाठी चारित्र्यवान नेता निवडून येण्यासाठी प्रत्येकाने आपले अनमोल मत द्यावे.पाच वर्षातून एकदा मतदान प्रक्रियेत सर्व भारतीयांनी सहभागी होऊन राष्ट्रहित सर्वतोपरी ही भावना मनात जागृत करून तसेच या देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारक व राष्ट्र पुरुषांचा हिंदुत्वाचा विचार करूनच देशासाठी मतदान प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.खऱ्या अर्थाने या देशाला हिंदुत्वाची परिभाषा कोणी शिकवली असेल तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी. देशासाठी सर्वस्व पणाला लावून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारत मातेची महाआरती तसेच अनेक ग्रंथ लिहून विश्वामध्ये हिंदुत्वाचे नाव अजरामर केले आहे.ही शूर वीरांची भूमी आहे.छत्रपती शिवाजी महाराज,महाराणा प्रताप,गुरुगोविंद सिंग,चन्नम्मा,झाशीची राणी,नेता सुभाष बोस,अहिल्यादेवी होळकर,भगतसिंग या राष्ट्रपुरुषांचा आदर्श घेऊन देशाच्या लोकशाहीला बळकटी देण्यासाठी अबकी बार 400 चा आकडा पार करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे.आज देशात लव जिहाद,व्होट जिहाद, धर्मांतरण,गोहत्या नक्षलवाद,आतंकवाद अशा अनेक समस्या भेडसावत आहेत.तसेच काही धर्मांधांकडून व्होट जिहाद करण्यासाठी पत्रक बाजी करण्यात येत आहे. तर काही पक्षांकडून सरकार आले तर प्रभू श्रीरामाचे मंदिर पुन्हा झोपडीत बांधू अशाप्रकारे हिंदू संस्कृतीला व धर्माला हिनतेची वागणूक देण्याचे प्रकार निवडणुकीच्या काळात घडत आहेत.जर कोणी प्रभू श्रीरामाच्या मंदिराला वाईट भावना मनात ठेवून हात लावण्याचा जरी विचार केला तर समस्त हिंदू समाज,बजरंग दल,व विश्व हिंदू परिषद त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.आज देशात 400 चा आकडा पार झाल्यास एकच मंत्र देण्यात येईल जो हिंदू हितकी बात करेगा!वही देश पे राज करेगा !असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री शंकरजी गायकर यांनी केले आहे.                                 

  पटेल मंगल कार्यालय येथे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने हिंदू जनसंवाद मेळाव्या चे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी प्रमुख वक्ते विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सह मंत्री शंकर गायकर यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी महाराष्ट्र -गोवा मुंबई क्षेत्राचे बजरंग दलाचे क्षेत्र संयोजक विवेक कुलकर्णी,विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष अँड.जय भोसले,शहराध्यक्ष विजयकुमार पादिर,जिल्हा मंत्री अनिल जोशी,विभागीय अधिकारी गजेंद्र सोनवणे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल भांबरकर,बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष कुणाल भंडारी,भरत थोरात आदी उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेक कुलकर्णी यांनी केले. स्वागत व परिचय गजेंद्र सोनवणे यांनी करून दिला.सूत्रसंचालन भरत थोरात यांनी केले. तर आभार कुणाल भंडारी यांनी मानले.या कार्यक्रमासाठी विश्व हिंदू परिषद,मातृ शक्ती,बजरंग दल,रा.स्व.संघ,विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Monday, 6 May 2024

संत किसनगिरी नगर येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा शुभारंभ

श्रीमद् भागवत निष्ठेने श्रवण केल्यास सकल दुःखाचा नाश होऊन परमानंदाची प्राप्ती -साध्वी अनुराधा दीदी. 


प्रातःस्मरणीय सद्गुरु किसनगिरी बाबा यांच्या आशीर्वादाने व व भास्करगिरी बाबा यांच्या प्रेरणेने गुरुदत्त भक्तीधाम मंदिराच्या परिसरात श्रीमद् भागवत कथेचे दिव्यचिंतन करीत आहोत.हजारो जन्माच्या मिळविलेल्या पुण्याने श्रीमद् भागवत कथा ऐकण्याची बुद्धी प्राप्त होते.ऋषीमुनींनी जे समृद्ध भंडार ठेवले आहे.ते आपण कथेच्या माध्यमातून श्रवण करावे. जीवनात व प्राप्त झाले तर कायमच टिकतील असे नाही.परमात्मा भगवंत प्राप्त झाले तर ते कायमचे प्राप्त होतात. श्रीमद् भागवत निष्ठेने जे श्रवण करतात त्यांचे सकल दुःखांचा नाश होतो.आणि परमानंदाची प्राप्ती होते.भवरोगाचे रामबाण औषध भागवत आहे. सत्संग म्हणजे काय आहे? ज्या संगाने भोगाचे महत्त्व कमी होते.ज्या संगाने परमात्मा भगवंत प्राप्त होतो. त्याला सत्संग म्हणतात, नामस्मरण करण्याची प्रेरणा निर्माण होते त्याला सत्संग म्हणतात.श्रीमद् भागवत हे मनोरंजनाचे साधन नाही तर मनोभंजनाचे साधन आहे. मनोज कृष्णमय कसे करायचे आहे हे शिकवणारे भागवत आहे. भोगाच्या दिशेने चाललेली दिशा भगवंताच्या दिशेकडे वळविण्यासाठी श्रीमद् भागवत हे शास्त्र आहे.असे निरूपण भागवताचार्य व रामायणाचार्य साध्वी प.पू.अनुराधा दीदी यांनी पहिले पुष्प गुंफताना केले आहे.पाईपलाईन रोड येथील संत किसनगिरी नगर येथील गुरुदत्त भक्तीधाम मंदिरात श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला.याप्रसंगी संत किसनगिरी नगर परिसरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली.श्रीमद् भागवत ग्रंथाचे पालखीत पूजन करून तसेच वारकरी भजनी मंडळ व महिला मंडळ तसेच भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली.महिलांनी फुगडीचा फेर धरला,परिसरात ठिकठिकाणी रांगोळ्या काढून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले.याप्रसंगी भागवताचार्य व रामायणाचार्य साध्वी परमपूज्य अनुराधा दीदी यांची बगीतून मिरवणूक काढण्यात आली.याप्रसंगी सद्गुरु किसनगिरी बाबा नगर भक्त मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.