Thursday, 9 January 2025

*निसर्गसृष्टी गोपालन संस्थेत स्व. सौ.सुनंदा दिगंबर जोशी सभागृहाचा लोकार्पण सोहळा संपन्न*


 *गो सेवेचे कार्य ईश्वरप्रिय-महंत रामगिरी महाराज* 

अहिल्यानगर - संकटातून व प्रयत्नातून निसर्गसृष्टी गोशाळा सुरू झाली या गोशाळेत मोठ्या प्रमाणात कत्तलखान्यातून वाचविलेल्या गाईंचा सांभाळ केला जातो. भगवान परमात्मा श्रीकृष्णाने गोपालन व गोसंवर्धन केले आहे.गोसेवा हीच खरी ईश्वर सेवा आहे.राजयोगी गंगागिरी महाराजांनी सव्वा दोनशे वर्षांपूर्वी सरला बेट येथे गोशाळा सुरू केली आहे.गोहत्या होऊ नयेत यासाठी कायदा केला आहे.तरी देखील गोहत्या होत आहेत.जे गोरक्षा चे कार्य करतात त्यांना सहकार्य करावे.तसेच शेतकऱ्यांनी देखील कसायाला काय विकू नये. महाराष्ट्र राज्य सरकारने गोमातेला राजमाते चा दर्जा दिला आहे.तसेच प्रत्येक गाईसाठी पन्नास रुपये निधी जाहीर केला आहे.यामुळे एक दोन एकर शेती असलेल्या शेतकऱ्याला गाई विकण्याची गरज भासणार नाही.असे प्रतिपादन सरला बेट चे महंत गुरुवर्य रामगिरी महाराज यांनी केले आहे.

इसळक येथे निसर्ग सृष्टी गोपालन संस्था संचलित श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज गोशाळेत श्री भगवान महावीर जीवदया निवारा शेड, स्व.सौ.सुनंदा दिगंबर जोशी सभागृह लोकार्पण सोहळा आणि गोमाता मुक्तसंचार गोठा भूमीपूजन सोहळा उत्साहात पार पडला‌.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री संत गंगागिरी महाराज संस्थान,गोदाधाम सरला बेटचे मठाधिपती महंत गुरुवर्य हभप.रामगिरी महाराज, विदर्भरत्न रामायणाचार्य ह.भ.प.संजय महाराज पाचपोर, प्रज्ञाचक्षु गुरुवर्य मुकुंद काका जाटदेवळेकर महाराज,संत तुकाराम महाराज यांचे १० वे वंशज ह.भ.प. माणिक महाराज मोरे,वर्धमान संस्कारधाम, मुंबईचे राजुभाई शाह,बजरंग दलाचे महाराष्ट्र व गुजरात राज्याचे क्षेत्रीय संयोजक विवेक कुलकर्णी,आ.संग्राम जगताप,अक्षय कर्डिले,प्रांत संघचालक नानासाहेब जाधव,समस्त गोरक्षा आघाडीचे अध्यक्ष मिलींद एकबोटे,हभप श्रीनिवास महाराज घुगे, मठाधिपती योगेश भैय्या गायकवाड महाराज,दीनदयाळ परिवाराचे संस्थापक अध्यक्ष वसंत लोढा,भाजपाचे नितिन उदमले,उद्योजक भिमराव फुंदे,महेश इंदानी,सुहास फुंदे, बाबासाहेब सानप,भगवान फुलसौंदर,इसळकचे माजी सरपंच संजय गेरंगे,सरपच छायाताई गेरंगे आदींच्या प्रमुख उपस्थितीत निसर्गसृष्टी गोपालन संस्थेत उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
यावेळी गोभक्त,हिंदू धर्म बांधव व जिल्ह्यातील गोरक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
विदर्भ रत्न संजय महाराज पाचपोर म्हणाले,जोशी परिवाराच्या देणगीतून निसर्गसृष्टी गोपालन संस्थेत एक चांगले सभागृह उभारले आहे.गो सेवेच्या कार्यात जोशी परिवाराचे मोठे योगदान आहे.गरज आहे त्या ठिकाणी दान करणे महत्त्वाचे आहे.गोमातेला आपण दान द्यायची गरज आहे.आई आपल्याला सांभाळते न मागता जे पाहिजे ते देते.परंतु आज गोमातेला गरज पडावी.हे आपले दुर्भाग्यच आहे.यज्ञ केल्याने जे पुण्य भेटते,तीर्थक्षेत्राने जे पुण्य भेटते,तेच पुण्य गोसेवा केल्याने भेटते. 
आमदार संग्राम जगताप म्हणाले, हिंदू धर्मात गोमातेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गोहत्या बंदी कायदा करून देखील गोहत्या होत आहेत.गोहत्या करणाऱ्या आरोपींनी वारंवार गुन्हे केले तर त्यांना मोक्का लावण्यात यावा.असा कठोर कायदा करण्याची आवश्यकता आहे.यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा करू.तसेच जिल्ह्यात आणखी गोशाळांची आवश्यकता आहे.असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गौतम कराळे यांनी केले.तर आभार आभार श्रीनिधी सोमिनी यांनी मानले‌.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी दिंगबर जोशी,उद्योजक धनंजय जोशी,निसर्गसृष्टी गोपालन संस्थेचे अध्यक्ष डाॅ.विलास जाधव,सचिव गौतम कराळे, उपाध्यक्ष विश्वास बेरड, खाजिनदार गजेन्द्र सोनवणे,विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल भांबरकर,हिंदू राष्ट्र सेनेचे अध्यक्ष संजय आडोळे,उद्योजक बाळासाहेब लोटके,अपुर्व गुजराथी,ललित चोरडिया,मुकल गंधे,निलेश चिपाडे,भुषण भणगे,रुद्रेश अंबाडे,निलेश गेरंगे,विकास चव्हाण,रविन्द्र पवार,
अमोल हुंबे पा.श्रीकांत साठे,निखिल धंगेकर,रुद्रेश अंबाडे,
हभप रविन्द्रनाथ महा.सुद्रिक, विष्णुपंत कुलकर्णी यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील गोरक्षक व हिंदू धर्म बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment