महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीच्या अभिनव बालवाडी, सखाराम मेहेत्रे प्राथमिक विद्यालय व केशवराव गाडीलकर हायस्कूलचे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ दि. १५/०६/२०२४ रोजी विद्यालयात मोठ्या उत्साहान संपन्न झाला. अध्यक्षस्थानी महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा. श्री. नामदेवराव गाडीलकर यांनी भूषविले. कार्यकमाचे प्रमुख अतिथी महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा. श्री. वसंतराव बेलेकर, सदस्य मा. श्री. विलासराव सावळे मा. सौ. पुष्पाताई बोरुडे, अध्यक्षा, महिला व बालविकास समिती, अहमदनगर महानगरपालिका व मा. सौ. वंदनाताई ताठे, नगरसेविका, अहमदनगर महानगरपालिका हे उपस्थित होते. श्री. नामदेवराव गाडीलकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यालयांतील विद्यार्थ्यांना गुणवान होण्यासाठी तसेच सर्व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहू असे अश्वासन दिले. तसेच विद्यालयाच्या निसर्गरम्य वातावरणाचे कौतुक करून गोरगरीब अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाणारी शाळा असे सौ. पुष्पाताई बोरूडे यांनी आपल्या भाषणांत सागितले. तसेच सौ. वंदनाताई ताठे यांनी नविन वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देवून मुलीनी मोफत शिक्षणाचा फायदा घेवून उच्चशिक्षित व्हावे असे आवाहन केले.
विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास हेव विद्यालयाचे ध्येय असून विविध स्पर्धा परीक्षांतून विद्यालयाचा नावलौकीक वाढवावा असे संस्थेचे उपाध्यक्ष श्री वसंतराव बेलेकर यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात सांगितले.
कार्यक्रमावेळी प्राथमिक विद्यालयाच्या प्र.मुख्याध्यापिका श्रीम. काळे लतिका आप्पाजी, माध्यमिक विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक श्री. गायकवाड अनिल शंकर, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच परीसरातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीम. संगिता बनकर व आभारप्रदर्शन सौ. जयश्री देशपांडे यांनी केले,
No comments:
Post a Comment