मनपाच्या वतीने जनतेमध्ये योगासंदर्भात जनजागृती केली जाणार - अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी
देशामध्ये जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून आज अहमदनगर महानगरपालिके तील अधिकारी कर्मचारी यांनी एकत्र येत योगाचे महत्त्व समाजाला पटवून देण्याचे काम केले आहे. भविष्यकाळात नगर शहरातील जनतेमध्ये योगासंदर्भात जनजागृती केली जाणार आहे. योग हा व्यायाम नसून एक जीवन पद्धत आहे. योगामुळे शरीर, मन, बुद्धी या सर्वांवर चांगला परिणाम होत असून आनंदीमय जेवण जगता येत असते. शासकीय कर्मचारी यांना काम करीत असताना ताण-तणाव निर्माण होत असतो. मात्र दैनंदिन योग साधनेच्या माध्यमातून आपले शरीर निरोगी व सुदृढ राहत असते त्यामुळे आपण समाजामध्ये चांगले काम करू शकतो. असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी केले.
अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने जागतिक योग दिन उत्साहात साजरा केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी,प्रकाश लोखंडे, उपयुक्त विजयकुमार मुंडे, उपयुक्त श्रीकांत साताळकर, जल अभियंता परिमल निकम, शहर अभियंता मनोज पारखे, आस्थापन विभाग प्रमुख मेहेर लहारे, इंजिनिअर गणेश गाडळकर, आदीसह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रकश लोखंडे , डॉ. भावना पेंदम, बेलेश्वर पेंदम यांनीं योगा प्रशिक्षण दिले.