Saturday, 22 June 2024

महापालिकेत जागतिक योग दिन साजरा

मनपाच्या वतीने जनतेमध्ये योगासंदर्भात जनजागृती केली जाणार - अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी
देशामध्ये जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात असून आज अहमदनगर महानगरपालिके तील अधिकारी कर्मचारी यांनी एकत्र येत योगाचे महत्त्व समाजाला पटवून देण्याचे काम केले आहे. भविष्यकाळात नगर शहरातील जनतेमध्ये योगासंदर्भात जनजागृती केली जाणार आहे. योग हा व्यायाम नसून एक जीवन पद्धत आहे. योगामुळे शरीर, मन, बुद्धी या सर्वांवर चांगला परिणाम होत असून आनंदीमय जेवण जगता येत असते. शासकीय कर्मचारी यांना काम करीत असताना ताण-तणाव निर्माण होत असतो. मात्र दैनंदिन योग साधनेच्या माध्यमातून आपले शरीर निरोगी व सुदृढ राहत असते त्यामुळे आपण समाजामध्ये चांगले काम करू शकतो. असे प्रतिपादन अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी यांनी केले. 
   अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने जागतिक योग दिन उत्साहात साजरा केला. यावेळी अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी,प्रकाश लोखंडे, उपयुक्त विजयकुमार मुंडे, उपयुक्त श्रीकांत साताळकर, जल अभियंता परिमल निकम, शहर अभियंता मनोज पारखे, आस्थापन विभाग प्रमुख मेहेर लहारे, इंजिनिअर गणेश गाडळकर, आदीसह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी प्रकश लोखंडे , डॉ. भावना पेंदम, बेलेश्वर पेंदम यांनीं योगा प्रशिक्षण दिले.

Saturday, 15 June 2024

विद्यालयांत नवगतांचे स्वागत उत्साहात


महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीच्या अभिनव बालवाडी, सखाराम मेहेत्रे प्राथमिक विद्यालय व केशवराव गाडीलकर हायस्कूलचे वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ दि. १५/०६/२०२४ रोजी विद्यालयात मोठ्या उत्साहान संपन्न झाला. अध्यक्षस्थानी महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीचे सचिव मा. श्री. नामदेवराव गाडीलकर यांनी भूषविले. कार्यकमाचे प्रमुख अतिथी महात्मा फुले एज्युकेशन सोसायटीचे उपाध्यक्ष मा. श्री. वसंतराव बेलेकर, सदस्य मा. श्री. विलासराव सावळे मा. सौ. पुष्पाताई बोरुडे, अध्यक्षा, महिला व बालविकास समिती, अहमदनगर महानगरपालिका व मा. सौ. वंदनाताई ताठे, नगरसेविका, अहमदनगर महानगरपालिका हे उपस्थित होते. श्री. नामदेवराव गाडीलकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात विद्यालयांतील विद्यार्थ्यांना गुणवान होण्यासाठी तसेच सर्व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासासाठी सतत प्रयत्नशील राहू असे अश्वासन दिले. तसेच विद्यालयाच्या निसर्गरम्य वातावरणाचे कौतुक करून गोरगरीब अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण दिले जाणारी शाळा असे सौ. पुष्पाताई बोरूडे यांनी आपल्या भाषणांत सागितले. तसेच सौ. वंदनाताई ताठे यांनी नविन वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देवून मुलीनी मोफत शिक्षणाचा फायदा घेवून उच्चशिक्षित व्हावे असे आवाहन केले.
विद्यार्थ्यांचा सर्वागीण विकास हेव विद्यालयाचे ध्येय असून विविध स्पर्धा परीक्षांतून विद्यालयाचा नावलौकीक वाढवावा असे संस्थेचे उपाध्यक्ष श्री वसंतराव बेलेकर यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात सांगितले.
कार्यक्रमावेळी प्राथमिक विद्यालयाच्या प्र.मुख्याध्यापिका श्रीम. काळे लतिका आप्पाजी, माध्यमिक विद्यालयाचे प्र.मुख्याध्यापक श्री. गायकवाड अनिल शंकर, विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच परीसरातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीम. संगिता बनकर व आभारप्रदर्शन सौ. जयश्री देशपांडे यांनी केले,

Sunday, 2 June 2024

*मेहेर इंग्लिश स्कूलमध्ये ढोल ताशा व तुतारीच्या गजरात नवागतांचे स्वागत*

*बालवयातच मुलांना शाळेची आवड निर्माण व्हावी-जगदीश झालानी*                                             

मुलांनी शाळेत आल्यानंतर आनंदी वातावरणात शिक्षण घ्यावे.यासाठी शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच शाळेतील शिक्षक प्रयत्न करीत असतात.मुलांना शाळेचा कंटाळा येऊ नये. यासाठी मुलांना विविध खेळ, संगीत,नृत्य,गोष्टींची पुस्तके आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आले आहे.बालवयातच मुलांना शाळेची आवड निर्माण व्हावी. असे प्रतिपादन मेहेर इंग्लिश स्कूलचे चेअरमन जगदीश झालानी यांनी केले आहे. हिंद सेवा मंडळाच्या मेहेर इंग्लिश स्कूलमध्ये शाळेच्या पहिल्या दिवशी नवागतांचे स्वागत ढोल,ताशाच्या व तुतारीच्या गजरात मोठ्या उत्साहात करण्यात आले.प्रवेशद्वारासमोर आकर्षक फुग्यांची कमान करण्यात आली होती.शाळेतील शिक्षिका राजश्री बिडकर यांनी मिकी माऊसचा वेष परिधान करून सगळ्यांचे लक्ष वेधले.दा चौधरी विद्यालय,पटवर्धन चौक येथून विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली.मेहेर इंग्लिश स्कूलच्या प्रवेशद्वारा जवळ आल्यानंतर शाळेतील शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्याला औक्षण करून फुलांची उधळण केली.
याप्रसंगी मेहेर इंग्लिश स्कूलचे चेअरमन जगदीश झालानी,प्राचार्या प्रा.अनुरीता झगडे,दादा चौधरी मराठी शाळेचे मुख्याध्यापक सुभाष येवले, दीपक शिंदे,संतोष भंडारी,मनोज हिरणवाळे,सत्यश्री चिलका, मोहिनी नराल,आशा घोरपडे, राजश्री बिडकर,दळवी पूनम,सुनिता भोपाळे,आयमन बागवान आदी उपस्थित होते. प्रा.अनुरीता झगडे म्हणाले,मेहेर इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी हसत खेळत शिक्षण घ्यावे. यासाठी वर्षभर विविध उपक्रम सण,उत्सव साजरे केले जातात.तसेच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येते. विद्यार्थ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य चांगले राहावे.यासाठी विद्यार्थ्यांसाठी आरोग्य शिबीर ही घेतले जाते.तसेच प्राणायाम विविध व्यायामाच्या प्रकारे शिकवले जातात.

Thursday, 9 May 2024

*जो हिंदू हितकी बात करेगा!वही देश पे राज करेगा -शंकरजी गायकर*

विश्व हिंदू परिषदेचा हिंदू जनसंवाद मेळावा उत्साहात*                                                                                                  
   नगर-देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. देशहितासाठी चारित्र्यवान नेता निवडून येण्यासाठी प्रत्येकाने आपले अनमोल मत द्यावे.पाच वर्षातून एकदा मतदान प्रक्रियेत सर्व भारतीयांनी सहभागी होऊन राष्ट्रहित सर्वतोपरी ही भावना मनात जागृत करून तसेच या देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारक व राष्ट्र पुरुषांचा हिंदुत्वाचा विचार करूनच देशासाठी मतदान प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.खऱ्या अर्थाने या देशाला हिंदुत्वाची परिभाषा कोणी शिकवली असेल तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी. देशासाठी सर्वस्व पणाला लावून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारत मातेची महाआरती तसेच अनेक ग्रंथ लिहून विश्वामध्ये हिंदुत्वाचे नाव अजरामर केले आहे.ही शूर वीरांची भूमी आहे.छत्रपती शिवाजी महाराज,महाराणा प्रताप,गुरुगोविंद सिंग,चन्नम्मा,झाशीची राणी,नेता सुभाष बोस,अहिल्यादेवी होळकर,भगतसिंग या राष्ट्रपुरुषांचा आदर्श घेऊन देशाच्या लोकशाहीला बळकटी देण्यासाठी अबकी बार 400 चा आकडा पार करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे.आज देशात लव जिहाद,व्होट जिहाद, धर्मांतरण,गोहत्या नक्षलवाद,आतंकवाद अशा अनेक समस्या भेडसावत आहेत.तसेच काही धर्मांधांकडून व्होट जिहाद करण्यासाठी पत्रक बाजी करण्यात येत आहे. तर काही पक्षांकडून सरकार आले तर प्रभू श्रीरामाचे मंदिर पुन्हा झोपडीत बांधू अशाप्रकारे हिंदू संस्कृतीला व धर्माला हिनतेची वागणूक देण्याचे प्रकार निवडणुकीच्या काळात घडत आहेत.जर कोणी प्रभू श्रीरामाच्या मंदिराला वाईट भावना मनात ठेवून हात लावण्याचा जरी विचार केला तर समस्त हिंदू समाज,बजरंग दल,व विश्व हिंदू परिषद त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.आज देशात 400 चा आकडा पार झाल्यास एकच मंत्र देण्यात येईल जो हिंदू हितकी बात करेगा!वही देश पे राज करेगा !असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री शंकरजी गायकर यांनी केले आहे.                                 

  पटेल मंगल कार्यालय येथे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने हिंदू जनसंवाद मेळाव्या चे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी प्रमुख वक्ते विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सह मंत्री शंकर गायकर यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी महाराष्ट्र -गोवा मुंबई क्षेत्राचे बजरंग दलाचे क्षेत्र संयोजक विवेक कुलकर्णी,विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष अँड.जय भोसले,शहराध्यक्ष विजयकुमार पादिर,जिल्हा मंत्री अनिल जोशी,विभागीय अधिकारी गजेंद्र सोनवणे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल भांबरकर,बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष कुणाल भंडारी,भरत थोरात आदी उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेक कुलकर्णी यांनी केले. स्वागत व परिचय गजेंद्र सोनवणे यांनी करून दिला.सूत्रसंचालन भरत थोरात यांनी केले. तर आभार कुणाल भंडारी यांनी मानले.या कार्यक्रमासाठी विश्व हिंदू परिषद,मातृ शक्ती,बजरंग दल,रा.स्व.संघ,विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Monday, 6 May 2024

संत किसनगिरी नगर येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा शुभारंभ

श्रीमद् भागवत निष्ठेने श्रवण केल्यास सकल दुःखाचा नाश होऊन परमानंदाची प्राप्ती -साध्वी अनुराधा दीदी. 


प्रातःस्मरणीय सद्गुरु किसनगिरी बाबा यांच्या आशीर्वादाने व व भास्करगिरी बाबा यांच्या प्रेरणेने गुरुदत्त भक्तीधाम मंदिराच्या परिसरात श्रीमद् भागवत कथेचे दिव्यचिंतन करीत आहोत.हजारो जन्माच्या मिळविलेल्या पुण्याने श्रीमद् भागवत कथा ऐकण्याची बुद्धी प्राप्त होते.ऋषीमुनींनी जे समृद्ध भंडार ठेवले आहे.ते आपण कथेच्या माध्यमातून श्रवण करावे. जीवनात व प्राप्त झाले तर कायमच टिकतील असे नाही.परमात्मा भगवंत प्राप्त झाले तर ते कायमचे प्राप्त होतात. श्रीमद् भागवत निष्ठेने जे श्रवण करतात त्यांचे सकल दुःखांचा नाश होतो.आणि परमानंदाची प्राप्ती होते.भवरोगाचे रामबाण औषध भागवत आहे. सत्संग म्हणजे काय आहे? ज्या संगाने भोगाचे महत्त्व कमी होते.ज्या संगाने परमात्मा भगवंत प्राप्त होतो. त्याला सत्संग म्हणतात, नामस्मरण करण्याची प्रेरणा निर्माण होते त्याला सत्संग म्हणतात.श्रीमद् भागवत हे मनोरंजनाचे साधन नाही तर मनोभंजनाचे साधन आहे. मनोज कृष्णमय कसे करायचे आहे हे शिकवणारे भागवत आहे. भोगाच्या दिशेने चाललेली दिशा भगवंताच्या दिशेकडे वळविण्यासाठी श्रीमद् भागवत हे शास्त्र आहे.असे निरूपण भागवताचार्य व रामायणाचार्य साध्वी प.पू.अनुराधा दीदी यांनी पहिले पुष्प गुंफताना केले आहे.पाईपलाईन रोड येथील संत किसनगिरी नगर येथील गुरुदत्त भक्तीधाम मंदिरात श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला.याप्रसंगी संत किसनगिरी नगर परिसरात भव्य शोभायात्रा काढण्यात आली.श्रीमद् भागवत ग्रंथाचे पालखीत पूजन करून तसेच वारकरी भजनी मंडळ व महिला मंडळ तसेच भाविकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली.महिलांनी फुगडीचा फेर धरला,परिसरात ठिकठिकाणी रांगोळ्या काढून शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले.याप्रसंगी भागवताचार्य व रामायणाचार्य साध्वी परमपूज्य अनुराधा दीदी यांची बगीतून मिरवणूक काढण्यात आली.याप्रसंगी सद्गुरु किसनगिरी बाबा नगर भक्त मंडळाचे सर्व सदस्य उपस्थित होते.

दादा चौधरी मराठी शाळेत धमाल उन्हाळी छंद वर्गाचा समारोप उत्साहात संपन्न

विद्यार्थ्यांना अभ्यासात गुंतून न ठेवता आनंददायी शिक्षण द्यावे.सततच्या अभ्यासाने मुलांवर अभ्यासाचा ताण येतो.मुलांना वेगवेगळ्या खेळण्यातून, कृतीतून शिक्षण द्यावे.उन्हाळी शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला जातो.दादा चौधरी मराठी शाळेत चांगल्या प्रकारे धमाल छंद वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा मुलांना भरपूर फायदा झाला आहे. या शिबिरात भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करते.तसेच डिसेंबर महिन्यातही अशा प्रकारे शिबिर घ्यावे.अशी मागणी विद्यार्थ्यांनी करावी.असे प्रतिपादन हिंद सेवा मंडळाचे कार्यकारणी सदस्या प्रा. ज्योतीताई कुलकर्णी यांनी केले आहे. हिंद सेवा मंडळाच्या दादा चौधरी मराठी शाळेत तीन वर्ष ते दहा वर्षे वयोगटातील मुलांसाठी धमाल उन्हाळी छंद वर्गाचा समारोप उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरुवातीला महाराष्ट्र बालक मंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका अर्चना गिरी व विश्रामबाग शाळेच्या बालवाडी विभागाच्या पर्यवेक्षिका वर्षा चिखले यांच्या हस्ते सरस्वती पूजनाने करण्यात आली. याप्रसंगी प्रमुख उपस्थितीत हिंद सेवा मंडळाचे जेष्ठ मार्गदर्शक अजित बोरा,कार्यकारणी सदस्य प्रा.ज्योतीताई कुलकर्णी,दादा चौधरी विद्यालयाच्या प्रभारी मुख्याध्यापिका सौ.नंदा कानिटकर,मेहेर इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका प्रा.अनुरीता झगडे ,दिलीप परसपाटकी आदि उपस्थित होते. अजित बोरा म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी शिबिराच्या माध्यमातून अत्यंत चांगले शैक्षणिक उपक्रम घेण्यात आले आहेत.विद्यार्थ्यांचे मनोरंजन,खेळ,तसेच व्यक्तिमत्व विकास होण्यासाठी प्रेरणादायी चित्रपट हंबीरराव मोहिते दाखविण्यात आला आहे. या शिबिरात भाग घेतलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन. धमाल छंद वर्गात अकरा दिवसात शिकवलेल्या उपक्रमापैकी नृत्य सादरीकरण दोन गटात करण्यात आले.अनुष्का चंगेडिया या विद्यार्थिनीने भरतनाट्यम नृत्य सादर केले. कु‌.आर्या उपरे, रचना कनोरे,सारंगा कुलकर्णी, गौरव बेद्रे,शेळके या विद्यार्थ्यांनी मनोगत सादर केली.प्रास्ताविक सुभाष येवले म्हणाले, शाळेचे चेअरमन सुमतीलाल कोठारी यांच्या मार्गदर्शनाखाली छंद वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.दर शनिवारी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी दप्तर मुक्त शाळा हा उपक्रम राबविला जातो. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.रुपाली वाळुंजकर यांनी केले.तर आभार दिलीप परसपाटकी यांनी मानले.या शिबिर यशस्वीतेसाठी शाळेतील मंगल पवार,गणगले मॅडम, वाकचौरे मॅडम,देवराव मॅडम, प्रिया अहिरे,रुचिता मॅडम,वैशाली डफळ आदींसह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Saturday, 20 April 2024

भगवान महाविरांची शिकवण ही सामाजिक कल्याणासाठी महत्वाची आहे - खा. डॉ. सुजय विखे पाटील

 
भगवान महावीर यांची शिकवण ही सामाजिक कल्याणासाठी असून प्रत्येकाने ती आत्मसाद केली पाहिजे असे मत महायुतीचे उमेदवार  खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी सर्व जैन बांधवांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.महावीर जयंतीच्या निमित्ताने दाल मंडई आडते बाजार, धार्मिक परिक्षा बोर्ड तसेच विविध ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला त्यांनी भेट देऊन भगवान महाविरांच्या मुर्तीस पुष्प अर्पण केले. 
यावेळी बोलताना खासदार म्हणाले की, भगवान महावीर हे त्याग, करूणा आणि संवेदनशीलतेचे प्रतिक आहेत. त्यांची संयम, सदाचार, करुणा आणि अहिंसा ही शिकवण समाजाच्या कल्याणासाठी आहे. यामुळे ही शिकवण प्रत्येकाने आत्मसाद करूण जीवन सुखकर करावे असे त्यांनी सांगितले.त्याच बरोबर जैन बांधवांना त्यांनी महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासह मा.नगरसेक सचिन जाधव, अजिक्य तळे, प्रशांत मुथ्था, कमलेश भंडारी आणि महावीर  ग्रुपचे  विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खा. सुजय विखे पाटील यांनी नागरिकांच्या भेटी घेतल्या आणि त्यांच्याशी संवाद साधला.