नगर-देशात लोकशाहीचा उत्सव सुरू आहे. देशहितासाठी चारित्र्यवान नेता निवडून येण्यासाठी प्रत्येकाने आपले अनमोल मत द्यावे.पाच वर्षातून एकदा मतदान प्रक्रियेत सर्व भारतीयांनी सहभागी होऊन राष्ट्रहित सर्वतोपरी ही भावना मनात जागृत करून तसेच या देशासाठी बलिदान देणाऱ्या क्रांतिकारक व राष्ट्र पुरुषांचा हिंदुत्वाचा विचार करूनच देशासाठी मतदान प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे.खऱ्या अर्थाने या देशाला हिंदुत्वाची परिभाषा कोणी शिकवली असेल तर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी. देशासाठी सर्वस्व पणाला लावून स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भारत मातेची महाआरती तसेच अनेक ग्रंथ लिहून विश्वामध्ये हिंदुत्वाचे नाव अजरामर केले आहे.ही शूर वीरांची भूमी आहे.छत्रपती शिवाजी महाराज,महाराणा प्रताप,गुरुगोविंद सिंग,चन्नम्मा,झाशीची राणी,नेता सुभाष बोस,अहिल्यादेवी होळकर,भगतसिंग या राष्ट्रपुरुषांचा आदर्श घेऊन देशाच्या लोकशाहीला बळकटी देण्यासाठी अबकी बार 400 चा आकडा पार करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे.आज देशात लव जिहाद,व्होट जिहाद, धर्मांतरण,गोहत्या नक्षलवाद,आतंकवाद अशा अनेक समस्या भेडसावत आहेत.तसेच काही धर्मांधांकडून व्होट जिहाद करण्यासाठी पत्रक बाजी करण्यात येत आहे. तर काही पक्षांकडून सरकार आले तर प्रभू श्रीरामाचे मंदिर पुन्हा झोपडीत बांधू अशाप्रकारे हिंदू संस्कृतीला व धर्माला हिनतेची वागणूक देण्याचे प्रकार निवडणुकीच्या काळात घडत आहेत.जर कोणी प्रभू श्रीरामाच्या मंदिराला वाईट भावना मनात ठेवून हात लावण्याचा जरी विचार केला तर समस्त हिंदू समाज,बजरंग दल,व विश्व हिंदू परिषद त्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही.आज देशात 400 चा आकडा पार झाल्यास एकच मंत्र देण्यात येईल जो हिंदू हितकी बात करेगा!वही देश पे राज करेगा !असे प्रतिपादन विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सहमंत्री शंकरजी गायकर यांनी केले आहे.
पटेल मंगल कार्यालय येथे विश्व हिंदू परिषदेच्या वतीने हिंदू जनसंवाद मेळाव्या चे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी प्रमुख वक्ते विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय सह मंत्री शंकर गायकर यांनी मार्गदर्शन केले.याप्रसंगी महाराष्ट्र -गोवा मुंबई क्षेत्राचे बजरंग दलाचे क्षेत्र संयोजक विवेक कुलकर्णी,विश्व हिंदू परिषदेचे जिल्हाध्यक्ष अँड.जय भोसले,शहराध्यक्ष विजयकुमार पादिर,जिल्हा मंत्री अनिल जोशी,विभागीय अधिकारी गजेंद्र सोनवणे,जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अमोल भांबरकर,बजरंग दलाचे जिल्हाध्यक्ष कुणाल भंडारी,भरत थोरात आदी उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विवेक कुलकर्णी यांनी केले. स्वागत व परिचय गजेंद्र सोनवणे यांनी करून दिला.सूत्रसंचालन भरत थोरात यांनी केले. तर आभार कुणाल भंडारी यांनी मानले.या कार्यक्रमासाठी विश्व हिंदू परिषद,मातृ शक्ती,बजरंग दल,रा.स्व.संघ,विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.