Saturday, 20 April 2024

भगवान महाविरांची शिकवण ही सामाजिक कल्याणासाठी महत्वाची आहे - खा. डॉ. सुजय विखे पाटील

 
भगवान महावीर यांची शिकवण ही सामाजिक कल्याणासाठी असून प्रत्येकाने ती आत्मसाद केली पाहिजे असे मत महायुतीचे उमेदवार  खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी सर्व जैन बांधवांना महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या.महावीर जयंतीच्या निमित्ताने दाल मंडई आडते बाजार, धार्मिक परिक्षा बोर्ड तसेच विविध ठिकाणी आयोजित केलेल्या कार्यक्रमाला त्यांनी भेट देऊन भगवान महाविरांच्या मुर्तीस पुष्प अर्पण केले. 
यावेळी बोलताना खासदार म्हणाले की, भगवान महावीर हे त्याग, करूणा आणि संवेदनशीलतेचे प्रतिक आहेत. त्यांची संयम, सदाचार, करुणा आणि अहिंसा ही शिकवण समाजाच्या कल्याणासाठी आहे. यामुळे ही शिकवण प्रत्येकाने आत्मसाद करूण जीवन सुखकर करावे असे त्यांनी सांगितले.त्याच बरोबर जैन बांधवांना त्यांनी महावीर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांच्यासह मा.नगरसेक सचिन जाधव, अजिक्य तळे, प्रशांत मुथ्था, कमलेश भंडारी आणि महावीर  ग्रुपचे  विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खा. सुजय विखे पाटील यांनी नागरिकांच्या भेटी घेतल्या आणि त्यांच्याशी संवाद साधला.

कामरगाव प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

 कामरगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा यांच्या वतीने वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले.या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून श्री. सुधीर पाटील (उपविभागीय अधिकारी. नगर), श्री. संजय शिंदे (तहसिलदार. नगर), तसेच गट शिक्षणाधिकारी बाबुराव जाधव, केंद्र प्रमुख बाळासाहेब दळवी यांची प्रमुख उपस्थिती होती.मान्यवरांच्या हस्ते सरस्वस्ती पूजन व दिप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी प्रमुख अतिथींसह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी  उपविभागीय अधिकारी श्री.सुधीर पाटील व तहसिलदार श्री. संजय शिंदे यांच्या शुभहस्ते ग्रामपंचायत कडून शाळेस देण्यात आलेल्या पाच एल. ई.डी. स्क्रीन चे उदघाटन व लोकार्पण करण्यात आले. 
कामरगाव जिल्हा परिषद शाळेच्या प्रगतीचे कौतुक करत विदयार्थ्याना भौतिक व डिजिटल शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल  आनंद व्यक्त  करत इतर माध्यमांच्या शाळेच्या तोडीस तोड शाळा असल्याचे मत उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील यांनी व्यक्त केले. तसेच नगरचे तहसिलदार श्री.संजय शिंदे यांनी कामरगाव शाळेतील विदयार्थ्याची गुणवत्ता व कलागुणांच कौतुक करत ग्रामीण भागातील विदयार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण आवश्यक असल्याच मनोगत व्यक्त करत शाळेच्या पट संख्येबाबत व सुविधांबाबत कौतुक केले. तसेच दोन्ही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी  शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष  पत्रकार हेमंत साठे व शालेय व्यवस्थापन समितीच्या कामाचे देखील कौतुक केले.
      या वार्षिक स्नेहसंमेलनाचे सुरवात श्रीगणेशाच्या नृत्याने झाली. विविध ऐतिहासिक व आधुनिक  गीतांवर विद्यार्थ्यांनी नृत्याविष्कार सादर केले. वार्षिक स्नेहसंमेलन म्हणजे विद्यार्थ्यांच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण असतो. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या नेतृत्वाला व कलागुणांना वाव मिळतो. या विचारांना अनुसरून हे स्नेहसंमेलन आयोजित करण्यात आले होते.याप्रसंगी सरपंच तुकाराम कातोरे, उपसरपंच पूजा संदिप लष्करे, ग्रा.पं. सदस्य.गणेश साठे, लक्ष्मण अण्णा  ठोकळ, हाबू शिंदे,संदिप ढवळे, सोसायटी चेअरमन सुनिल चौधरी, राजू राजगुरु संचालक मंगल ठोकळ, उद्योजक मनोज ठोकळ, ग्रामसेवक सुरेश मगर, तलाठी हर्षल करपे यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमासाठी ग्रा.पं. सदस्य. अश्विनी ठोकळ, उप सरपंच अनिल आंधळे , सतिष, कातोरे, प्रशांत साठे, डॉ संदिप पवार, मुख्याध्यापिका भारती झावरे, शिक्षिका मंदाकिनी दावभट, शुभांगी क्षिरसागर, नंदा पठारे, लक्ष्मी गायकवाड, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण शेरकर यांनी केले.

दिलदारसिंग बीर पुन्हा शिवबंधनात आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश

 सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत दिलदारसिंग बीर यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला. माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते बीर यांनी शिवबंधन बांधले.
नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांनी काढलेल्या स्वाभिमानी जनसंवाद यात्रेची नगर शहरात गांधी मैदानावर सांगता झाली. या कार्यक्रमात बीर यांचा पुन्हा शिवसेनेत प्रवेश झाला. यावेळी महाविकास आघाडीचे शरद पवार, बाळासाहेब थोरात, रोहित पवार, विक्रम राठोड, माजी आमदार राजेंद्र आवळे, भूषणसिंह होळकर, राजेंद्र फाळके, भगवान फुलसौंदर, प्रताप ढाकणे, संभाजी कदम, अभिषेक कळमकर, दत्ता जाधव, बाळासाहेब बोराटे, किरण काळे, दत्ता जाधव किरण डफळ, सतिश बल्लाळ आदी उपस्थित होते.
दिलदारसिंग बीर यांनी माजी मंत्री स्व. अनिल राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेत प्रवेश करुन आपल्या सामाजिक व राजकीय कारकीर्दची सुरुवात केली. 26 जानेवारी 2002 रोजी बागडपट्टीत पहिली शिवसेनेची शाखा सुरु केली. त्याचप्रमाणे बागडपट्टीचा राजा प्रतिष्ठान ट्रस्टच्या माध्यमातून सामाजिक कार्य सुरु केले. या प्रतिष्ठानच्या माध्यमातून बीर यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबवून सर्वसामान्य नागरिक व युवकांशी जोडले गेले. तर शिवसेनेत शाखाप्रमुख ते उपशहरप्रमुख म्हणून काम करताना त्यांनी अनेक सामाजिक प्रश्‍न हाताळून शिवसेना वाढविण्याचे काम केले.2013 मध्ये ते राष्ट्रवादीत गेले. 10 वर्ष राष्ट्रवादीत शहर जिल्हा उपाध्यक्ष व सरचिटणीस पदाची जबाबदारी सांभाळली. मात्र पुन्हा त्यांनी शिवसेनेत येण्याचा निर्णय घेतला. त्यांनी शिवसेनेत केलेल्या प्रवेशाचे शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधून स्वागत होत आहे.

 

ओबीसी नेते छगनराव भुजबळ यांच्या उमेदवारीला विरोध करणार्‍यांचा निषेधओबीसींवरील अन्याया विरोधात लढा देणार- दिलीपराव खेडकर

  राज्यासह देशात ओबीसीचे मोठे संघटन छगनराव भुजबळ यांनी उभे केले, ओबीसींवर ज्या-ज्या वेळी अन्याय झाला, त्या-त्या वेळी छगनराव भुजबळ यांनी पदाची तमा न बाळगता ओबीसींच्या हक्कासाठी खंबीरपणे त्यांच्या मागे उभे राहिले. प्रसंगी सरकारच्या विरोधातही भुमिका घेतली. अशा राज्यातील सर्व पक्ष, घटकांतील ओबीसींसाठी काम करणार्‍या छगनराव भुजबळ यांना नाशिकमधून लोकसभेची उमेदवारी देण्याची दिल्लीमधून चर्चा होती, परंतु काही लोकांनी या ओबीसी नेत्याला विरोध दर्शविणे ही निषेधार्थ बाब आहे. आज राज्यात लोकसभेची निवडणुक होत असतांना, ओबीसी समाजाच्या नेत्यांवर अशा प्रकारे बहिष्कार टाकण्याचे षडयंत्र आखले जात आहे. यामुळे जे लोक या प्रवृत्ती मागे आहे, त्यांच्या विरोधात राज्यातील ओबीसी समाजाच्या तीव्र भावना आहे. आम्हीही या अशा घटनेचे निषेध करुन ओबीसी नेते छगनराव भुजबळ यांच्या मागे उभे आहोत. राज्यभर या घटनेने पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा माजी सनदी अधिकारी  दिलीपराव खेडकर यांनी दिला आहे.ओबीसीचे नेते छगनराव भुजबळ यांच्या उमेदवारीबाबत विरोध करणार्‍यांचा ओबीसी बहुजन आघाडीच्यावतीने माजी सनदी अधिकारी दिलीपराव खेडकर यांच्या नेतृत्वाखाली नगरमध्ये निषेध व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी वामनराव भदे, राजेंद्र कोथिंबीरे, प्रसाद गाडेकर, बंडू कोथिंबीरे, आकाश वारे, संजय बेद्रे, एकनाथ खेडकर, आदिनाथ दहिफळे, नवनाथ खेडकर आदि उपस्थित होते.पुढे बोलतांना दिलीपराव खेडकर म्हणाले, आज ओबीसी समाजावर अन्याय होत आहे, त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे ओबीसींचे मजबूत संघटन राज्यात केले जात आहे. सध्याच्या लोकसभा निवडणुकीतही ओबीसींना डावल्याचा प्रयत्न झाला, त्यामुळे आम्ही स्वतंत्र उमेदवार उभे केले आहेत, त्याचबरोबर ज्या-ज्या ठिकाणी ओबीसी उमेदवार आहे, त्यांना सहकार्य करणार असल्याचे सांगितले. यावेळी नगरमधील अनेक पदाधिकार्‍यांनी ओबीसी नेते छगनराव भुजबळ यांच्या उमेदवारीला विरोध करणार्‍यांचा तीव्र शब्दात निषेध करुन या निवडणुकीतून ओबीसींची ताकद दाखवून देऊ, असे सांगितले.

मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थित डॉ. सुजय विखे दाखल करणार उमेदवारी अर्ज, अॅड. अभय आगरकरांनी दिली माहिती

अहिल्यानगर दक्षिणेचे महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील कधी आणि कशा पद्धतीने अर्ज दाखल करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले असताना भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अॅड. अभय आगरकर यांनी माहिती दिली की, राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या प्रमुख उपस्थित २२ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. 
अहिल्यानगर लोकसभेत भाजपचे उमेदवार हे विजयाचे प्रमुख दावेदार असल्याने त्यांच्या उमेदवारी अर्जाकडे संपुर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून आहे. अभय आगरकर यांनी सांगितले की, २२ एप्रिल रोजी डॉ. सुजय विखे पाटील हे जिल्हाधिकारी कार्यालय येथे ११ वाजता आपला अर्ज दाखल करणार आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत. त्याचबरोबर आमदार मोनिका राजळे, आमदार प्रा. राम शिंदे, जिल्हाबॅंकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले, माजी मंत्री तथा आमदार बबनराव पाचपुते, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार चंद्रशेखर कदम,माजी आमदार चंद्रशेखर घुले, भाजप जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब नाहटा, शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष बाबुशेठ टायरवाले, अनिल शिंदे यांच्यासह सर्व मित्र पक्षाचे पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. 
अहिल्यानगर मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवाद करून आपल्या मिरवणुकीला सुरवात करणार आहेत. माळीवाडा वेस येथून विशाल गणपतीचे दर्शन घेत, पंच पीर चावडी मार्गे माणिक चौक, भिंगारवाला चौक, तेलीखुंट, चितळे रोड, स्वा. वीर सावरकर चौक, दिल्लीगेट ते निलक्रांती चौक येथे मिरवणुकीची सांगता होईल.यावेळी ठिकठिकाणी पुष्पवृष्टी आणि सत्कार केला जाणार आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात भाजप, महायुती आणि घटक पक्ष, मित्र, पक्षाचे हजारो कार्यकर्ते यावेळी हजर राहणार असल्याचे आगरकर यांनी सांगितले. 
सुजय विखे पाटील यांनी मागील पाच वर्षात केलेल्या विकास कामाच्या जोरावर जिल्ह्यातील जनतेचा कौल त्यांच्या बाजूने देशात सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची गॅरंटी सुरू आहे. यामुळे सुजय विखे पाटील यांचा विजय निश्चित असून ते मोठ्या मताधिक्याने निवडून येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.