Monday, 11 February 2019

नगर तालुक्यासाठी 10 कोटी 30 लाखांचा निधी मंजूर


नगर । प्रतिनिधी - नगर तालुक्यातील विविध गावांतील 6 रस्त्यांच्या कामासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत प्रशासकीय मान्यता दिली असून या रस्त्यांच्या कामासाठी 10 कोटी 30 लाख 23 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती आ. शिवाजीराव कर्डिले यांनी दिली.
यामध्ये राहुरी मतदारसंघात समावेश असलेल्या नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी ते सटूबाई मंदिर रस्ता (2.5 किमी) 1 कोटी 89 लाख 14 हजार, जेऊर आठरे वस्ती ते ससेवाडी रस्ता (1.880 किमी) 1 कोटी 66 लाख 80 हजार, ससेवाडी ते महादेवखोरं रस्ता (1.940 किमी ) 1 कोटी 52 लाख 61 हजार, कापूरवाडी ते दत्तवाडी रस्ता (0.925 किमी) 83 लाख 13 हजार, गव्हाणवस्ती (काळामळा वस्ती ते मांजरसुंबा ) रस्ता (1.540किमी) 1 कोटी 35 लाख 70 हजार तसेच आ.संग्राम जगताप यांच्या शिफारशीनुसार नगर शहर विधानसभा मतदार संघातील नालेगांव, वारुळाचा मारुती ते निंबळक रस्ता (3.475किमी) 3 कोटी 2 लाख 68 हजार असा निधी मंजूर झाला आहे. आ.कर्डिले यांनी सांगितले की, रस्त्यांच्या कामाबाबत या भागातील नागरिकांनी आपणाकडेही मागणी केली होती. त्या अनुषंगाने आपण शासन स्तरावर पाठपुरावा करून सदरचा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेत प्रस्तावित करण्याची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. अखेर या पाठपुराव्यास यश आले असून नगर तालुक्यातील या विविध 6 रस्त्यांच्या कामासाठी 10 कोटी 30 लाख 23 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. लवकरच याबाबत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. सदरच्या रस्त्याची देखभाल दुरुस्ती संबंधित विभागाकडून काम पूर्ण झाल्यानंतर 5 वर्ष करण्यात येणार आहे. त्यासाठी 47 लाख 61 हजाराचा अतिरिक्त निधीही मंजूर झाला आहे. या निधीच्या मंजुरी साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचेही आ. शिवाजीराव कर्डिले म्हणाले.

No comments:

Post a Comment